संस्कृत वाङ्मयातील श्रीगणेश

लक्ष्मण कृष्ण पित्रे

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि प्रत्येक कार्यारंभी आवर्जून पूजिले जाणारे दैवत म्हणजे श्री गणेश होय. त्याच्या अग"पूजेने कोणत्याही कार्यातील विघ्ने दूर होतात आणि निर्विघ्नपणे कार्यसिद्धी होते अशी जनमानसात दृढ श्रद्धा आहे. विघ्नविनाशक आणि विघ्ननियंत्रक असे या देवाचे स्वरूप आहे. आपल्या संस्कृत वाङ्मयात त्याचे जे दर्शन होते त्यावरून मुळात विघ्नकर्ता असलेला हा देव विघ्नहर्ता मंगलदायक कसा बनला याची रोचक उपपत्ती आपणास आढळते.

संस्कृतीचा मूलाधार

संस्कृत वाङ्मय हे आपल्या संस्कृतीचा मूलाधार आहे. वेद, वेदांगे, ब"ाह्मणे, आरण्यके, उपनिषदे आणि पुराणे यातून व्यक्त झालेले धर्मस्वरूप आणि दार्शनिक विचार हे आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रणालीचा जणू आरसाच आहेत. या वाङ्मयात गणेशाचा उ"ेख आणि वर्णन कुठे आणि कसे येते हे आपण आज पाहणार आहोत.
वस्तूत: गणपती हे दैवत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आर्यपूर्वकाळापासूनच अस्तित्वात होते हे सिद्ध करणारे पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. संस्कृत वाङ्मय हे आर्यांच्या आगमनानंतरच निर्माण झाले, परंतु त्यातील सर्वांत प्राचीन असलेल्या ऋग्वेदात गणपतीचा नि:स्संदिग्ध उ"ेख सापडत नाही असे विद्वानांचे मत आहे. ऋग्वेदातील "गणांना त्वा गणपति हवामहे' ही ऋचा असणारे सूक्त गणपतीला उद्देशून नसून आर्यांची अन्य देवता ब"ह्मणस्पती हिला उद्देशून आहे, हे स्पष्ट आहे. तसेच ऋग्वेदातील "आतून इंद्र क्षुमन्तं' अशी सुरूवात असलेले सूक्त मुळात इंद्राचे आहे. त्यातील "महाहस्ती दक्षिणेन' या उ"ेखावरून ते गणपतीशी जोडले गेले आहे.

गणपतीचे उ"ेख

शुक्ल यजुर्वेदात "रूद्रस्य गणपत्यमं' असा उ"ेख आहे तो रुद्राक्षासंबंधी आहे. दुसऱ्या एका उ"ेखात "वसुरूपी गणपती' असे अश्वमेधातील अश्वाला उद्देशून म्हटले आहे. (अश्वमेध यज्ञामध्ये राणी अश्व यांना एका आवरणात निजवून काही मंत्र म्हटले जाण्याचा विधी असतो. त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रात "गणानां त्वा गणपति' हा मंत्र म्हटला जातो.) तैत्तिरिय आरण्यकात रूद्रगायत्री आणि गणेशगायत्री यांच्यात साम्य दाखविणारा हा मंत्र आहे.
तत्पुरूषाय विद्महे वक"तुण्डाय धीमहि।
तन्नो दन्ती प्रचोदयात।।
पुढे पुराणकाळात "तत्पुरूष' च्या जागी "एकदंत' शब्द घातला जाऊ लागला आणि तो गणेशगायत्री मंत्र बनला. रामायण आणि काही प्राचीन पुराणे यांच्यामध्येही गणपतीचा उ"ेख आढळत नाही. यानंतरच्या काही वाङ्मयात रुद्र, शिव आणि गणेश यांना समान विशेषणे लावलेली दिसतात. त्यावरून सुरूवातीला ही अभिन्न एकच देवता असावी असे वाटते. नंतर गणपती हा शिवगणांचा प्रमुख आणि शिवाचा पुत्र मानला गेला याचे बीज या कल्पनेत असावे.
ईश, केन, कठ आदी मु"य उपनिषदांमध्ये गणपती नाही, परंतु नव्या उपनिषदांमध्ये गणेशपूर्वतापिनी, गणेशोत्तरतापिनी, गणपत्यर्थवशीर्ष अशी उपनिषदे गणेशावर आहेत. साधारण गुप्तकाळामध्ये रचल्या गेलेल्या गणपत्यर्थवशीर्ष या उपनिषदातील गणेश कल्पना ही आजच्या आपल्या गणेशकल्पनेशी जुळती आहे. त्यात गणपतीचे वर्णन आहे -
"एकदंतं चतुर्हस्तं पाशामंकुशधारिणम्
रदं च वरदं हस्तै र्बिभ"ाणं मूषकध्वजम्
रक्तगंधानुलिप्तांग रक्तपुष्पै सुपूजितम्'
या उपनिषदामध्ये (जे गणपत्यथर्वशीर्ष म्हणून प्रसिद्ध आहे) गणपतीला देवस्वरूपच मानले आहे. इतकेच नव्हे तर त्याला या विश्वाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता तसेच साक्षात ब"ह्मच म्हटले आहे. (त्वमेव सर्व खल्विदं ब"ह्मसि।) हे उपनिषद अथर्ववेदाचे आहे.
गणेशाचे हे ब"ह्मस्वरूप समाजाच्या सर्व स्तरांमध्ये बिंबवण्याचे कार्य पुराणांनी केले. काही प्राचीन पुराणांमध्ये जरी गणेशाचा उ"ेख नसला तरी पंधरा-सोळा पुराणांपेक्षा अधिक पुराणांमध्ये गणेश वेगवेगळ्या प्रमाणात उ"ेखिलेला आढळतो. त्याच्या कथा, व"ते त्यामध्ये आली आहेत, पण त्यातही गणेशपुराण हे गाणपत्य संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ पुराण आहे. उपासनाखंड आणि क"ीडाखंड असे त्याचे दोन भाग आहेत. उपासनाखंडात गणेशमहात्म्य वर्णिलेले आहे. जगत्पालक जगदाधार, परमगती, सच्चिदानंदस्वरूप असे त्याचे वर्णन दिसते. गणेशोपासनेचे पार्थिवपूजा, गणेशव"त, संकष्ट चतुर्थी, अंगारकी व"त असे विविध प्रकार आहेत. त्या अनुषंगाने काही पौराणिक कथाही येतात. तारकासूर, कार्तवीर्य, अनलासूर, सिंधुदैत्य यांच्या कथा, तसेच गृत्समद, रूक्मांगद यांच्या आ"यायिकाही यामध्ये आहेत. प्रत्येक कथेचा गणेशाशी संबंध जोडून गणेशमहात्म्य दाखविले आहे. उदा. सृष्टिनिर्मितीला ब"ह्मदेवाला गणेशाचे सहाय्य आहे. त्रिपुरासूराला मारण्यास शिव हा गणेशसहस्त्रनामांमुळे समर्थ झाला इत्यादी.

गणेशाचे विविध अवतार

गणेशपुराणाच्या क"ीडाखंडात गणेशांच्या अवतारांचे वर्णन आहे. कृतयुगातील महोत्कट विनायक हा सिंहारूढ आणि दशभूज आहे. त्रेतायुगातील मयूरेश्वर हा मयूरारूढ आणि षड्भुज आहे, तर द्वापारयुगात तो मूषकवाहन चतुर्भुज गजानन आहे. (हेच रूप आपल्या परिचयाचे आहे.) या पुराणानुसार कलियुगात तो "धूम"वर्ण' या नावाने अवतार घेणार आहे. याच खंडात भगवद्गीतेच्या धर्तीवर रचलेली गणेशगीताही आहे.
गणेशासंबंधीचे, गणेशपुराणाखालोखाल महत्त्वाचे पुराण म्हणजे मुद्गलपुराण होय. ते गणेशपुराणानंतर रचले गेले असून गणेशपुराणातील सर्व कथा यात सारांशरूपाने येतात. मुद्गलऋषी हा या पुराणाचा वक्ता असून दक्ष राजा श्रोता आहे. गणेशपुराणाहून या पुराणाचा उद्देश वेगळा आहे. गणेशकथा सांगणे हा गणेशपुराणाचा उद्देश आहे, तर गणेशतत्वाचे आध्यात्मिक स्पष्टीकरण करणे हा मुद्गल पुराणाचा उद्देश आहे. गणेशतत्वाची परब"ह्मस्वरूपात मांडणी केलेली आढळते.
गणेशपुराणाहून भिन्न अशा गणेशाच्या वक"तुंड, एकदंत आदी अवतारांच्या कथा पुराणात येतात. रंभेला पाहून कामातुर झालेल्या इंद्राच्या वीर्यापासून निर्माण झालेल्या आणि शुक"ाचार्यांकडून पंचाक्षरी विद्या घेऊन तप करून उन्मत्त झालेल्या "मत्सर' नामक असुरांचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने "वक"तुंड' हा अवतार धारण केला आणि त्रैलोक्यावर सत्ता गाजवणाऱ्या मत्सरासुराला शरण आणले.
आश्विनीकुमारांना यज्ञात हविर्भाग नव्हता. त्यांनी तारूण्य प्राप्त करून दिलेल्या कृतज्ञ च्यवनऋषींनी त्यांना यज्ञात हविर्भाग देण्याचे ठरविले. त्यामध्ये विघ्न आणणाऱ्या इंद्राच्या पारिपत्यासाठी च्यवनांनी तपोबलाने "मदासूर' निर्माण केला. गजाननाने "एकदंत' अवतार घेऊन त्याला वठणीवर आणले.
एकदा भोलेनाथ शंकर एका भिि"णीवर भुलले. त्यांच्या एकत्र येण्याने "मोहासूर' निर्माण झाला. त्याने त्रैलोक्य जिंकून देवांना संकटात आणले. "महोदर' अवतार धारण करून गणेशाने त्याला शांत केले.
शकुनीच्या "दुर्बुद्धी' नामक पुत्राला गणेशाने "विघ्नहर' रूपाने ठार केले. त्याचा पुत्र "ज्ञानारी' याने पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी तप करून सामर्थ्य मिळविले आणि देवांना त्रस्त केले. ज्ञानारीचा पुत्र "सुबोध' हा मात्र गणेशभक्त होता, म्हणून पित्याने त्याचाही छळ केला. नंतर गणेशाने ज्ञानारीचा वध केला.
विष्णूच्या वीर्यापासून जन्मलेल्या "कामासूर' दैत्याचाही गणेशाने "विकट' अवतार घेऊन वध केला.
एकदा कुबेर कैलासावर पार्वतीला पाहून मोहित झाला. त्याच्यापासून "लोभासूर' निर्माण झाला. त्यालाही गणेशाने पाताळात दडपले.
अभिनंदन नावाचा राजा यज्ञात इंद्राला हविर्भाग देईना तेव्हा इंद्राने कालपुरूषाला यज्ञविद्ध्वंसार्थ पाठविले. त्याने "विघ्नासूर' रूप घेऊन सर्वच यज्ञांचा विद्ध्वंस आरंभला. त्याला ठार मारण्यासाठी गणेशाने "विघ्नराज' अवतार घेतला.
एकदा पार्वतीला भोलेनाथ शंकर आपल्याला वश आहेत याचा गर्व झाला. तिच्या हास्यातून "मयासूर' निर्माण झाला. त्याला मारण्यासाठी गणेशाने "विघ्नेश्वर' हा अवतार घेतला. धर्मघ्न याला यज्ञधु"क नावाचा पुत्र होता. तो जगाला डोईजड झाला. त्याला मारण्यासाठी गणेशाने "शूर्पकर्ण' अवतार घेतला.
एकदा सूर्याला गर्व झाला. त्याला शिंक आली त्यावेळी त्यातून "अहम्' असूर जन्मला. "धूम"वर्ण' अवतार घेऊन गणेशाने त्याला शरण आणले. वरील अवतार कथा म्हणजे कामक"ोधादिक षड्रिपूंवरच्या रूपककथा आहेत हे सहज लक्षात येते.
या दोन गणेशविषयक पुराणांव्यतिरिक्त अन्य पुराणांतही गणेश विषय आलेला आहे. भविष्यपुराणात अंगारकीव"त, विनायक स्तवनव"त, सिध्दिविनायकव"त आदी व"ते आली आहेत. वराहपुराणात वेगळीच निर्मितीकथा आहे. देवांच्या प्रार्थनेवरून शिवाने एक तेजस्वी पुरूष निर्माण केला. त्याला पार्वती पाहतच राहिली. तेव्हा शंकराने रागाने त्या पुरूषाला गजमुख आणि लंबोदर होण्याचा शाप दिला. शिवाच्या क"ोधामुळे निर्माण झालेल्या विघ्नकारक विनायक गणांचा अधिपती त्याला करण्यात आले, अशी कथा आहे.
ब"ह्मपुराणात अशी कथा आहे की दक्षाच्या यज्ञाचा शिवगणांनी विद्ध्वंस आरंभल्यावर यज्ञ हरिणरूपाने पळू लागला. तेव्हा गणेशाच्या क"ोधातून धर्मबिंदू पडला. त्यातून निर्माण झालेल्या क"ोधपुरूषाने हरिणरूपी यज्ञाला गिळून टाकले. अग्निपुराणात चतुर्थीव"त, गणपूजा, एकाक्षरविधान, विनायकार्चन आदी व"तांचे विधान आढळते. स्कंदपुराण, भविष्योत्तरपुराण यामध्येही गणेशाचा उ"ेख आला आहे.
एकदा पार्वतीने मळाचा पुतळा करून तो स्नानगृहावर रक्षक म्हणून ठेवला. शंकराला त्याने आत जाण्यास अटकाव केल्यानंतर संतापाच्या भरात त्याचा शंकरांनी शिरच्छेद केला. नंतर पार्वतीचा क"ोध शांत करण्यासाठी एका हत्तीचे मस्तक लावून त्याला जिवंत करण्यात आले. ही शिवपुराणातील गणेशाची जन्मकथा सर्वश्रुत आहे.

गजमुखाची कथा

गणेशाच्या गजमुखासंबंधी भविष्यपुराणात एक वेगळीच कथा आहे. एकदा पार्वतीने शनीला गणपतीकडे बघायला सांगितले. शनीच्या दृष्टिक्षेपामुळे गणपतीचे मस्तक गळून पडले. शोकाकूल पार्वतीला सांगितले की, प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक सापडेल ते त्याच्या देहाला लाव म्हणजे तो सजीव होईल. पार्वतीला हत्तीचे मस्तक सापडले व तिने ते लावल्यावर गणपती सजीव झाला. ब"ह्मपुराणात अशीच कथा आहे. फक्त तेथे हत्तीचे मस्तक श्रीकृष्णाने आणून लावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आर्येतरांच्या गणेशाची आर्यदेवता समूहात प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रथम त्याची गणना शंकराच्या गणात होऊ लागली. पुढे तो शिवगणांचा पती बनला. मग त्याच्या भक्तांनी त्याला शिव-पार्वतीचा पुत्र बनवले. त्याच्या विविध जन्मकथा पुराणातून निर्माण झाल्या. त्याच्या गजमुखाची सुसंगती लावणाऱ्या कथाही पुराणातून सांगितल्या आहेत.
तंत्रशास्त्रामध्येही गणपतीची मोठी महती आहे. वाममार्गी तांत्रिक, अश्लील पद्धतीने गणेशाराधना करीत मद्यप्राशन, स्वैरमैथून वगैरे गोष्टी पूजेच्या अंगभूत असत. या तंत्रात गणेशतंत्र म्हणून एक तंत्र आहे. त्यात या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तंत्रग"ंथामध्ये एकाच गणपतीचे अनेक प्रकार करून त्याची महागणपती, कुमारगणपती, नवनीतगणपती आदी विविध ध्याने सांगितली आहेत. वाममार्गातील गणेशाबरोबर शक्तीही असते आणि शक्तीसहित गणेश बहुधा नग्नच असतो.
बौद्धांच्या तंत्रग"ंथातही गणेश आहे. खुद्द बुद्धाने आनंद नावाच्या शिष्याला "गणपतिहृदय' हा रहस्यमय मंत्र सांगितला. बौद्ध धर्माबरोबरच गणपतीचाही भारताबाहेर प्रसार झाला हे मात्र खरे.
सारांश प्राचीन संस्कृत साहित्यातून गणपतीची अगणित रूपे आपल्यासमोर येतात. गणेशसंप्रदाय वाढू लागल्यानंतर गणेशमहात्म्य ग"ंथित करणारे अमाप साहित्य निर्माण झाले. प्रत्यक्ष वेदवाङ्मयात नि:संदिग्ध उ"ेख नसला तरी नंतर उपनिषदकालामध्ये वाङ्मयातून गणपती प्रकट होऊ लागला. गणपत्यर्थवशीर्षासारखी उपनिषदे तयार झाली. पुराणकाळामध्ये गणेशपुराण, मुद्गलपुराणही तयार झाले. इतर समकालीन पुराणामध्येही गणेशाच्या कथा विविधरूपांनी आकार घेऊ लागल्या आणि मुळात आर्येतरांचा असलेला हा साधा देव वैदिक धर्माच्या देवतासमुहात समाविष्ट होऊन प्रतिष्ठा पावला. मुळातले विघ्नकर्ता हे स्वरूप विघ्नहर्ता या रूपात परिणत झाले आणि त्याला प्रत्यक्ष ब"ह्माचे रूप दिले गेले असे संस्कृत वाङ्मयातील त्याच्या उ"ेखांवरून दिसून येते.

------

No comments: